विषय समिती सभापतींची अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:43+5:302021-02-24T04:09:43+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : नगर परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी साेमवारी (दि. २२) पालिकेच्या सभागृहात विशेष ...

Unopposed selection of subject committee chairpersons | विषय समिती सभापतींची अविरोध निवड

विषय समिती सभापतींची अविरोध निवड

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : नगर परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी साेमवारी (दि. २२) पालिकेच्या सभागृहात विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. त्यात सर्व विषय समितीच्या सभापतींची अविराेध निवड करण्यात आली.

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे ललित देशमुख झाले तर बांधकाम समिती सभापतिपदी काँग्रेसच्या सुवर्ण मानकर यांची निवड करण्यात आली. सुवर्ण मानकर या याच समितीच्या दुसऱ्यांदा सभापती बनल्या आहेत. आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या सिंधू धरपाळ, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे थानसिंग पटले यांची निवड करण्यात आली. महिला, बालकल्याण व नियोजन समितीचे सभापतिपद पालिकेच्या उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे यांच्याकडे आहे.

या समित्यांच्या सभापतिपदांसाठी अन्य कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सर्वांची बिनविराेध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष स्मृती ईखार, उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, ललित देशमुख, थानसिंग पटले, सुवर्ण मानकर, सिंधू धरपाळ यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. या विशेष सभेला राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले दोन नगरसेवक तसेच काँग्रेसचे दोन व भाजपचा एक नगरसेवक गैरहजर हाेता. पालिकेत भाजपचे मूळ सहा व राष्ट्रवादीतून आलेले दाेन असे एकूण आठ नगरसेवक असून, काँग्रेसचे आठ व शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) हेमा बडे या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी हाेत्या.

Web Title: Unopposed selection of subject committee chairpersons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.