शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

जिल्ह्यात अनधिकृत शाळा; संचालकांवर गुन्हे दाखल करा, जि.प. अध्यक्षांचे शिक्षण विभागाला निर्देश

By गणेश हुड | Updated: September 22, 2023 13:17 IST

अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

नागपूर : जिल्ह्यात अनेक अनधिकृत खासगी शाळा सुरू आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने अशा संस्था चालकांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.

अनधिकृत खासगी शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाकडून संबंधित पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले होते. परंतु पोलिस विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. संस्था चालकांच्या गैरप्रकाराला आळा बसावा, यासाठी पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांच्याशी समन्वय साधून संबंधित शाळांवर कार्यवाही करण्याबाबत अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना केली. बैठकीला मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सभापती अवंतिका लेकुरवाळे, मिलिंद सुटे, प्रवीण जोध, राजकुमार सुसुंबे, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, विरोधी पक्षनेते आतीश उमरे, दिनेश बंग, संजय झाडे, ज्ञानेश्वर कंभाले आदी उपस्थित होते.कृषी विकास अधिकारी यांना परत पाठवा

मागील स्थायी समिती समेत कृषी विकास अधिकारी संजय पिंगट यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी खुलासा सादर केला परंतु त्यांचा खुलासा समर्पक नसल्यामुळे समितीने तो अमान्य करण्यात आला. कृषी विकास अधिकारी याना शासनास परत पाठविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.

धानला आरोग्य केंद्राचे ऑडिट करा

तीन वर्षापूर्वी धानला येथे बांधकाम झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस भेगा पडल्या आहे. याची तपासणी करण्याची मागणी तापेश्वर वैद्य यांनी केली होती. त्यानुसार या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत आदेश देण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळाEducationशिक्षण