शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:09 IST

एका दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही घटना पीडित मुलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. जसपाल जेठानंद आसवानी (५०) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देआरोपीला अटक : फिरायला नेण्याच्या बहाण्याने गोंदियाला नेले

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : एका दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही घटना पीडित मुलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. जसपाल जेठानंद आसवानी (५०) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित राकेश (काल्पनिक नाव) नागपुरात राहतो. त्याला आईवडिल आणि एक लहान भाऊ आहे. दहावीत असूनही अभ्यास करत नसल्यामुळे आई त्याच्यावर रागावली. त्यावर रागाच्या भरात राकेश १३ जून रोजी सकाळी ट्युशनला जाण्याच्या बहाण्याने घरून निघाला. परंतु ट्युशनला न जाता तो शहरात इकडे-तिकडे फिरत होता. शेवटी तो नागपूर रेल्वे स्थानकावर आला. त्याला घरी जायचे होते. मात्र, घराकडे जाणारी शहर बस कुठे थांबते याविषयी त्याने जसपालला विचारणा केली. मी तुला बसस्टॉपपर्यंत सोडतो, असे सांगुन जसपालने त्याला आपल्या दुचाकीवर बसविले. दिवसभर फिरविल्यावर आपण गोंदियाला फिरायला जाऊ असे आमिष दाखविले. सायंकाळी राकेशला घेऊन तो इतवारी रेल्वे स्थानकावर गेला. तेथे दुचाकी ठेवून रात्री ८.३० वाजता राकेशला घेऊन गोंदियाला पोहोचला. तेथे त्याला लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे राकेश ओरडला. त्यावर लॉजचे कर्मचारी धावून गेले. परंतु जसपालने काहीच झाले नसल्याचे सांगून लॉजच्या कर्मचाऱ्यांना परत पाठविले. जसपालच्या मोबाईलवरून राकेशने मित्रांना कॉल केला होता. इकडे राकेश दिसत नसल्याने त्याचे आईवडिल मिसिंगची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तक्रार देत असतानाच राकेशच्या आईला फोन आला. त्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. आईने पत्ता विचारताच पोलीस नातेवाईकांना घेऊन गोंदियाला रवाना झाले. तेथे आरोपीला अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तपास लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक खुशाल शेंडगे करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर