शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

विना परवाना बायोडिझेलची पंपावरून विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 9:46 PM

केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखी बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पंप सुरू करीत आहे.

ठळक मुद्दे७ हजार कोटीच्या महसुलाचे नुकसान : व्हीपीडीएने केली कारवाईची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखी बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पंप सुरू करीत आहे. येथे ब्लेंडिंग न करता पूर्ण टाकी बायोडिझेलने भरण्यात येत आहे. परवानगी नसतानाही विना परवाना बायोडिझेल विक्री करण्यात येत असल्याने सरकारचे वर्षाला ७ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.तसेच बायोडिझेल व डिझेलच्या दरात भरपूर फरक आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपाच्या डीलरला नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु ट्रान्सपोर्टरला जीएसटीमध्ये सेट ऑफ मिळत असल्याने ते वाहनांमध्ये बायोडिझेल टाकण्यास जोर देत आहेत. विना परवाना बायोडिझेल विक्री करणाऱ्या पंपांवर कारवाई करण्याची मागणी विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सरकारला केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता, सचिव प्रणव पराते व माजी अध्यक्ष हरविंदरसिंह भाटिया यांनी पत्रपरिषदेत सांगितले की चिंचभवन, खापरी परिसरात एक बायोडिझेल पंप सुरू आहे. यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही संबंधित विभागाने कारवाई केली नाही. हिंगणा येथे मे महिन्यात असाच एक पंप सुरू होता. याची तक्रार असोसिएशनने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती. यानंतर संबंधित विभागाने पंपावर कारवाई केली होती. राज्यातील अन्य शहरांतही बायोडिझेलची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. त्यामुळे डिझेलच्या ३० टक्के मार्केटवर बायोडिझेल पंपाने कब्जा केला आहे. त्यामुळे राज्य सरकार व पेट्रोल पंप डीलरचे नुकसान होत आहे. एकीकडे तेल कंपन्यांनी बीएस-६ वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल तयार करण्यासाठी ७४ हजार कोटी रुपये खर्च करून रिफायनरीचे आधुनिकीकरण केले आहे. दुसरीकडे बायोडिझेलची अवैध पद्धतीने विक्री होत असल्याने तेल कंपन्यांचे सुद्धा नुकसान होत आहे. परंतु तेल कंपनी व सरकारी खाते याबाबत गंभीर नाही. त्यामुळे असोसिएशनने सरकारला या प्रकरणी नियमाकडे दुर्लक्ष करून बायोडिझेल विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Dieselडिझेलnagpurनागपूर