अज्ञात महिलेने मुलीचा गळा दाबून हिसकावले आईचे मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:25 IST2019-07-10T00:24:10+5:302019-07-10T00:25:57+5:30
गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली.

अज्ञात महिलेने मुलीचा गळा दाबून हिसकावले आईचे मंगळसूत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली.
अज्ञात महिला सुभाष रोडवरील काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या घरीसुद्धा गेली होती. परंतु त्यांच्या सुरक्षा रक्षकाने तिला पळवून लावले. त्यानंतर ती शेजारी राहत असलेल्या किशोर चांडक यांच्या घरी गेली. चांडक यांच्या घरी घरकाम करणारे एक कुटुंब राहते. अज्ञात महिला त्यांच्या घरात शिरली. त्यावेळी लहान मुलगी व तिची आई घरात होती. अज्ञात महिलेने घराचा दरवाजा लावून मुलीचा गळा आवळला. त्यामुळे घाबरून पीडित महिलेने तिला गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. सोबतच घरात असलेली काही रक्कमही दिली. महिला पसार झाल्यानंतर पीडित महिलेने प्रतापनगर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर अज्ञात महिला त्यात स्पष्ट दिसून आली. पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे.