शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

"मुस्लिम भगिनीही सुरक्षित फिरायला हव्या, जो गुंडगिरी करेल त्याला..."; नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:37 IST

नागपुरात बोलताना नितीन गडकरी यांनी मुस्लिम महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता नितीन गडकरी यांनी मुस्लिम महिलांबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. गुंडगिरी संपवायची असून महिलांच्या सुरक्षेमध्ये जो पुढे येईल, त्याला फटकावलं पाहिजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. खड्डे पडणार नाहीत इतके मजबूत रस्ते आम्ही केले आहेत. मी महापालिकेच्या बदमाश ठेकेदारांना सांगितले आहे की, रस्त्यावर खड्डे असतील तर तुमच्या अंगावरही खड्डे पडतील. आता भीतीपोटी सर्व कामे बरोबर केली जातात असेही नितीन गडकरींनी म्हटलं.

नागपुरातील ताजबाग येथे एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आहे. "आम्ही ताजबागमधून गुंडगिरी हटवली. मी इथल्या पोलीस उपायुक्तांना सांगितले की, गांजा, चरस असे व्यवसाय करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा. जो गुंडगिरी करेल त्याला मारा. मुस्लीम समाजाच्या भगिनींनीही रात्री ताजबागच्या रस्त्यावर सुरक्षितपणे फिरता यायला हवं. त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या कोणत्याही गुंडाला मारा. कोणी काही बोलत असेल तर माझे नाव सांगा. मी काळजी करणार नाही. माझ्या आई आणि बहि‍णींची अब्रु सुरक्षित राहिली पाहिजे," असं नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.काँग्रेसने ६० वर्षात काय केले? जनतेला काहीही दिले नाही, उलट जातीवादी राजकारण करून लोकांच्या मनात विष कालवले. काँग्रेसने नेहमीच संविधानाचा अपमान केला आणि मुस्लिमांना सांगितले की भाजप सत्तेवर आला तर ते तुम्हाला मारतील. मी मुस्लिमांच्या हातांवर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या पायाचे प्रत्यारोपण केले आहे. तेव्हा तुमची जात कोणती हे कधीच विचारले नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले.

"आम्ही कधीही जातीवादी राजकारण केले नाही. मात्र काँग्रेसने लोकांच्या मनात विष पेरलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार लोकसभा निवडणुकीत करण्यात आला. आम्ही राज्यघटना बदलली नाही आणि बदलणारही नाही, उलट काँग्रेस पक्षाने संविधानाचे तुकडे केले," असल्याचे गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४