शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शहरामध्ये धावताहेत अनफिट स्कूलबसेस, लोकमतच्या बातमीची हायकोर्टकडून दखल

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 25, 2024 18:02 IST

Nagpur : राज्य सरकारला एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश

राकेश घानोडेनागपूर : 'लोकमत'ने शहरामध्ये मोठ्या संख्येत धावत असलेल्या धोकादायक अनफिट स्कूलबसेससंदर्भात प्रकाशित केलेल्या बातमीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंभीर दखल घेतली व राज्य सरकारला यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.

मोटर वाहन कायद्यानुसार स्कूलबसेसची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. फिटनेस प्रमाणपत्र जारी झाल्याशिवाय स्कूलबसचा उपयोग केला जाऊ शकत नाही. परंतु, सध्या असंख्य स्कूलबसेस फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रोडवर धावत आहेत. नागपूर शहर, ग्रामीण व पूर्व नागपूर या तिन्ही आरटीओ कार्यालयांमध्ये एकूण ३ हजार ९९३ स्कूलबसेस व व्हॅनची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४८५ वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रच नाही. 'लोकमत'ने मंगळवारी यावर ठळक बातमी प्रकाशित करून अनफिट स्कूलबसेस व व्हॅन्समुळे विद्यार्थी व इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर संबंधित प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. फिरदौस मिर्झा यांनी ही बातमी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या न्यायपीठासमक्ष सादर करून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली. न्यायालयानेही या बातमीची गंभीर दखल घेऊन सरकारला उत्तर मागितले. 

जनहित याचिका प्रलंबित२०१२ मध्ये नागपूर येथील वीरथ झाडे या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूलबसखाली येऊन मृत्यू झाला होता. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन स्कूलबस नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ॲड. फिरदौस मिर्झा या प्रकरणात न्यायालय मित्र आहेत. 'लोकमत'च्या बातमीमुळे न्यायालयाने या प्रकरणावर ३ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

काय असते फिटनेस प्रमाणपत्र

वाहनाची अवस्था, ब्रेक, लाईट्स, परवाना, कागदपत्रे, चालक गाडी चालवण्यास सक्षम आहे का, वाहनमालक व चालकांवर कोणता गुन्हा दाखल आहे का, वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे शिक्षा झाली आहे का इत्यादीची दरवर्षी तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. या तपासणीत सर्व बाबी नियमानुसार आढळून आल्यानंतर आरटीओद्वारे संबंधित वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाते.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टLokmatलोकमतSchoolशाळाnagpurनागपूर