रोजगारासाठी बेरोजगारांचा मोर्चा

By Admin | Updated: January 11, 2017 02:57 IST2017-01-11T02:57:40+5:302017-01-11T02:57:40+5:30

कोराडी नवीन वीज निर्मिती प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा या मागणीसाठी

Unemployment Front for Employment | रोजगारासाठी बेरोजगारांचा मोर्चा

रोजगारासाठी बेरोजगारांचा मोर्चा

नागपूर : कोराडी नवीन वीज निर्मिती प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा या मागणीसाठी बेरोजगार युवा बहुउद्देशीय संस्थातर्फे सेवासदन शाळेपासून संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. स्थानिक लोकांना कामावर घेऊन स्थायी करण्यात यावे, बेरोजगार युवक युवतींना कुशल व अकुशल त्यांच्या गुणवत्तेनुसार रोजगार मिळावा, विद्युत प्रकल्प कोराडी येथून काढण्यात आलेल्या स्थानिक बेरोजागरांना सामावून घ्यावे, कामगार कायद्यानुसार कामगारांना ८ तास काम द्यावे, मोफत दवाखान्याची सोय कंपनीने करावी, ठेकेदारी पद्धती बंद करावी, यासह अन्य मागण्या मोर्चातून करण्यात आल्या.
सुधीर धुरिया, नासिर खान, सुरेश घोडमारे, उमेश मोटघरे, संदीप मेश्राम, राजेश सांडेल, संतोष शाहू, विशाल खांडेकर, गणेश लिमजे, सुरेश राऊत, अनिल देहेलकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात मोठ्या संख्येने महिला व युवती सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Unemployment Front for Employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.