नागपुरात नोकरीच्या नावावर बेरोजगार युवतीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 21:58 IST2020-10-24T21:57:41+5:302020-10-24T21:58:58+5:30
Unemployed girl cheated , crime news इंडिया पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी दिल्ली येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांनी फसवणूक केली.

नागपुरात नोकरीच्या नावावर बेरोजगार युवतीची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिया पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी दिल्ली येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आरोपी वर्षा ऊर्फ निता तायडे, वंशिका ऊर्फ डॉली तायडे व त्यांच्या साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनी तक्रारकर्त्या वैशाली डेनिस फैलिक्स रा. रमानगर यांच्या मुलीला नोकरी लावून देतो, असे सांगून ३.५० लाख रुपये घेतले होते. क्लर्क या पदासाठी बनावट नियुक्तीपत्र बनवून दिले होते. मात्र ही बोगसगिरी उघडकीस आली. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी आरोपीकडून पैसे परत मागितले. आरोपींनी १ लाख ५४ हजार रुपये दिले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.