ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST2021-06-28T04:07:26+5:302021-06-28T04:07:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून या समाजाची जनगणना करावी, अशी मागणी कामठी तालुका ...

Undo the political reservation of OBCs | ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून या समाजाची जनगणना करावी, अशी मागणी कामठी तालुका सरपंच संघटनेने केली असून, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे निवेदन साेपविले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, राज्य निवडणूक आयाेगाने जाहीर केलेल्या निवडणुका रद्द कराव्या, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांचा उल्लेख या निवेदनात केला हाेता. या मागण्यांची याेग्य दखल न घेतल्यास आंदाेलनाचा इशाराही सरपंच संघटनेने दिला आहे. तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार एस. बनाेटे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माेरेश्वर कापसे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, आडकाच्या सरपंच भावना चांभारे, खेडीचे लीलाधर काळे, रनाळाच्या सरपंच सुवर्णा साबळे यांचा समावेश हाेता.

Web Title: Undo the political reservation of OBCs