शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मनपाला विकास कामासाठी कोणत्या तरतुदींतर्गत परवानगी घ्यावी लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:19 IST

महानगरपालिकेला विकास कामे करण्यासाठी एमआरटीपी कायद्यातील कोणत्या तरतुदींतर्गत परवानगी घ्यावी लागते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला केली आणि यावर २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेला विकास कामे करण्यासाठी एमआरटीपी कायद्यातील कोणत्या तरतुदींतर्गत परवानगी घ्यावी लागते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला केली आणि यावर २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.महानगरपालिकेने धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कमध्ये विना परवानगी विविध प्रकारची विकास कामे केली आहेत. ती विकास कामे अधिकृत होण्यासाठी नियमितीकरण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने ही विचारणा केली. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या खासगीकरणाविरुद्ध सिव्हिक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात हा मुद्दा उपस्थित झाला.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी १० जुलै २०२० रोजी टेंडर नोटीस जारी करण्यात आली होती. टेंडर ६ आॅगस्ट रोजी उघडले जाणार होते. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे ही प्रक्रिया थांबली आहे. खासगी ऑपरेटर नियुक्त केल्यास या पार्कचा खाणे-पिणे, लग्न समारंभ, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जाईल. परिणामी, पार्कच्या मूळ उद्देशाची पायमल्ली होईल. मुलांना वाहतूक नियमांचे शिक्षण देण्याकरिता या पार्कचा विकास करण्यात आला आहे. हे पार्क मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे वादग्रस्त टेंडर नोटीस रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका