एका छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय
By Admin | Updated: January 23, 2016 03:00 IST2016-01-23T03:00:16+5:302016-01-23T03:00:16+5:30
इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन (आईआईटीई) चे शुक्रवारी महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात उद्घाटन करण्यात आले.

एका छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय
इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन : महापौरांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर : इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन (आईआईटीई) चे शुक्रवारी महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक बंडू राऊत उपस्थित होते. प्रसंगी आयोजित पत्रपरिषदेत आईआईटीईचे व्यवस्थापक अनुराग गुप्ता यांनी सांगितले की, प्रदर्शनात आठ राज्यांच्या पर्यटन मंडळासह खासगी ट्रॅव्हल कंपन्यांचे ४४ स्टॉल लागले आहेत. पर्यटनास इच्छूक असणाऱ्यांना विविध राज्यातील तसेच दुबई, थायलंड व देशातील उत्कृष्ट पर्यटन स्थळांवर निवास, भोजन व आदी व्यवस्थेसंदर्भात माहिती मिळते आहे. ते म्हणाले की, पर्यटन व्यवसाय सध्या तेजीत आहे. पर्यटन म्हणजे निव्वळ फिरणे नसून मानसिक शांती मिळविण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम आहे. अशांसाठी प्रदर्शनात एका छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. २४ जानेवारी पर्यंत सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात केंद्रीय पर्यटन विभागासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळच्या पर्यटन विकास महामंडळांचे स्टॉल आहेत. मेक माय ट्रीप, कॉक्स अॅण्ड किंग्ज, थॉमस कुक, महिंद्रा हॉलिडेज, जोकोन्स बीच रिसॉर्ट, गोवा कंपनीचे स्टॉल्स सुद्धा येथे आहे. उत्तर प्रदेश पर्यटन महामंडळाचे संचालक अभिलाष शर्मा म्हणाले की भारतात दर्शनीय पर्यटन स्थळांची कमतरता नाही. उत्तर प्रदेशात लखनौ, वाराणसी, आगरा येथील चटोली गल्ली, नवाबी पान आदीचा आनंद घेता येऊ शकतो. गुजरात पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ असोसिएट्स एक्झिक्युटीव्ह मॅनेजर बाप्पादित्य रॉय म्हणाले की, गुजरात मध्ये पर्यटन व्यवसायाला गती मिळाली आहे. येथे बघण्यासाठी भरपूर काही आहे. मध्य प्रदेश डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे रेसिडेंट मॅनेजर युवराज पडोळे यांनी मध्य प्रदेशात होणाऱ्या जलमहोत्सवाची, खजुराहो डान्स फेस्टिव्हल व सिंहस्थ कुंभमेळा (उज्जैन) बद्दल माहिती दिली. (वा. प्र.)