शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महारेरा कायद्यांतर्गत राज्यात १५ हजार प्रकल्पांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:26 IST

महारेरा कायद्यांतर्गत ५०० चौ.मी. क्षेत्र किंवा आठ फ्लॅट असलेल्या बांधकाम स्कीमसाठी महारेरा कायद्यांतर्गत बांधकाम व्यवसायिकास नोंदणी करणे आवश्यक असून आतापर्यंत राज्यात १५ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात विदर्भातील ६९० प्रकल्प असल्याची माहिती महारेराचे सविच वसंत प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमहारेरा सचिव वसंत प्रभू : ५०० चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्रावरील बांधकामासाठी नोंदणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महारेरा कायद्यांतर्गत ५०० चौ.मी. क्षेत्र किंवा आठ फ्लॅट असलेल्या बांधकाम स्कीमसाठी महारेरा कायद्यांतर्गत बांधकाम व्यवसायिकास नोंदणी करणे आवश्यक असून आतापर्यंत राज्यात १५ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात विदर्भातील ६९० प्रकल्प असल्याची माहिती महारेराचे सविच वसंत प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रकल्पाची नोंदणी न केल्यास व्यावसायिकास दंड ठोठावण्यात येतो. आतापर्यंत अनेक व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम कोटीच्या घरात आहे. या कायद्यांतर्गत बांधकाम व्यावसायिकास प्रकल्पासाठी (स्कीम) स्वतंत्र बँक खाती उघडणे आवश्यक आहे. यातील ७० टक्के रक्कम बांधकाम आणि जागा खरेदीसाठीच जमा ठेवणे आवश्यक आहे. बँकेतील रक्कम काढण्यासाठी आर्किटेक्ट आणि सीएची मंजुरी आवश्यक आहे. प्रकल्पाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरेड पाच वर्ष असून व्यावसायिकास दरवर्षी आॅडिट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महारेराचे उपसचिव गिरीश जोशी उपस्थित होते.तक्रार निवारणासाठी कौन्सिलेशन फोरममहारेरा अंतर्गत आतापर्यंत १९०० तक्रारी दाखल झाल्या असून ९०० तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तक्रारकर्त्यास पाच हजार रुपये भरावे लागते. तसेच त्यांना सुनावणीसाठी मुंबईत यावे लागते. महारेरा अंतर्गत येणाऱ्या ४० टक्के तक्रारी संवादाअभावी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामंजस्याने तक्रार सोडविण्यासाठी कौन्सिलेशन फोरम तयार करण्यात येत आहे. यात ग्राहक पंचायत आणि बिल्डर संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. मुंबई आणि पुणे येथे असा कौन्सिलेशन फोरम तयार करण्यात आला आहे. नागपुरातही कौन्सिलेशन फोरमचे तीन बेंच तयार करण्यात येणार आहे. यात अखिल भारतीय ग्राहक पंचातयतर्फे गजानन पांडे, नरेंद्र कुलकर्णी, गौरी चंद्रायण तर क्रेडाईतर्फे संतू चावला, सुनील दुधलवार व प्रशांत सरोदे यांचा समावेश असल्याची माहिती वसंत प्रभू यांनी दिली.

 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगnagpurनागपूर