रेमडिसीवर इंजेक्शनचा अनियंत्रित वापर....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:58+5:302021-04-05T04:07:58+5:30
प्रसिद्ध श्वसनराेग तज्ज्ञ व विदर्भ हाॅस्पिटल असाेसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अशाेक अरबट यांनी मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. काेणतेच ...

रेमडिसीवर इंजेक्शनचा अनियंत्रित वापर....
प्रसिद्ध श्वसनराेग तज्ज्ञ व विदर्भ हाॅस्पिटल असाेसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अशाेक अरबट यांनी मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. काेणतेच रुग्णालय रेमडिसीवर इंजेक्शनसाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क आकारत नाही आणि आमच्याकडे अशा काेणत्याही घटनेची माहिती नाही. विविध औषध कंपन्या त्यांच्या औषधाची गुणवत्ता, कन्टेंट आणि कार्यक्षमतेनुसार शुल्क आकारत असतात. जर किमतींमध्ये तफावत असेल, तर सरकारने त्यावर नियंत्रण आणावे. रुग्णालये शुल्क आकारताना औषधासाेबत येणाऱ्या इतर गाेष्टी आणि साेयी-सुविधांना धरून आकारत असतात. शासनाने सरकारी रुग्णालयांच्या साेयी-सुविधा विकसित कराव्या, जेणेकरून रुग्ण तेथे उपचार घेतील. आम्हाला काेराेना रुग्णांचा उपचार करण्याची उत्सुकता नव्हती आणि आम्ही नकारही दिला हाेता. मात्र, शासनाकडे एवढ्या माेठ्या प्रमाणात सुविधा नसल्याने दबावापाेटी रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत, असे मत डाॅ. अरबट यांनी व्यक्त केले.