शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनियंत्रित ट्रकने सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:30 IST

कोराडी रोडवरील मानकापूर चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकला धडक देत सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले. यात बाईक चालक भाऊही गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देभाऊसुद्धा गंभीर जखमी : मानकापूर चौकात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी रोडवरील मानकापूर चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकला धडक देत सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले. यात बाईक चालक भाऊही गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.आशा जैन (६०) रा. बिडीपेठ असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर दत्तात्रय वºहाडे (४६) असे जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे मानकापूर चौकात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आशा जैन या शिक्षिका होत्या. त्या दोन वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. दत्तात्रय वऱ्हाडे हे आशा यांचे मानलेले भाऊ आहेत. दत्तात्रय यांच्या मुलाचे लग्न आहे. त्यामुळे ते लग्न पत्रिका वाटण्यात व्यस्त आहेत. ते आशा यांना घेऊन लग्न पत्रिका वाटण्यासाठी मानकापूरला गेले होते. परत येत असताना हा अपघात घडला. मानकापूर चौकातून पलटत असताना जरीपटकाच्या दिशेने आलेल्या ट्रक क्रमांक पीबी. /४६/ एम/ ८९०७ च्या चालकांना जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. आशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मानकापूर पोलिसांनी ट्रक चालक सुखदेवसिंह जग्गासिंह (४७) रा. भुजिया, पंजाब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वर्षभरात चौघांचा मृत्यूसूत्रानुसार आशा यांच्या कुटुंबात एका वर्षात चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. वर्षभरापूर्वी त्यांचा सर्वात मोठा मुलगा आशिष याचा कामठी रोडवरील आॅटोमोटिव्ह चौकात अपघातात मृत्यू झाला. या घटनेच्या काही दिवसानंतरच पतीचाही आजाराने मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी लहान मुलगा स्वप्नील याचाही मृत्यू झाला. कुटुंबात आशा यांच्याशिवाय आशिषची पत्नी किरण, दहा वर्षाचा मुलगा आयुष आणि सात वर्षाची मुलगी वैदेही आहे. आशा एकट्याच राहत होत्या.रोजच अपघाताची भीतीमानकापूर चौक हा अतिशय धोकादायक असा चौक झाला आहे. येथे दररोज अपघात होत असतात.त्यामुळे येथून जातांना नागरिकांना घाबरतच जावे लागते. याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतात, पण ते वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पुलाखाली सावलीत उभे राहतात.मदत सोडून मोबाईल शुटिंगघटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती. पण कुणीही मदतीसाठी पुढे येत नव्हता. जो-तो स्वत:चा मोबाईल काढून शुटिंग करण्याचा किंवा फोटो काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे जखमींना वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू