अनियंत्रित ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:08 IST2021-04-27T04:08:33+5:302021-04-27T04:08:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पवनी (रामटेक) : चालकास झाेपेची डुलकी आल्याने अनियंत्रित झालेला भरधाव ट्रक सर्व्हिस राेडवर उलटला. त्यात ट्रकचालक ...

Uncontrolled truck overturned | अनियंत्रित ट्रक उलटला

अनियंत्रित ट्रक उलटला

लाेकमत न्यूज नेटवर्क

पवनी (रामटेक) : चालकास झाेपेची डुलकी आल्याने अनियंत्रित झालेला भरधाव ट्रक सर्व्हिस राेडवर उलटला. त्यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनी येथे रविवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

किस्मत अली माेहम्मद रा. उसरई, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. किस्मत अली हा यूपी-६७/एटी-२०७० क्रमांकाच्या ट्रकने नागपूर येथून जबलपूरकडे जात हाेता. दरम्यान, पवनी परिसरात चालकाला झाेपेची डुलकी आल्याने त्याचा ताबा सुटून भरधाव ट्रक महामार्गालगतच्या सर्व्हिस राेडवर उलटला. त्यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. लागलीच त्याला देवलापार ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस तपास करीत आहेत.

Web Title: Uncontrolled truck overturned