शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला डुलकी, अनियंत्रित ट्रॅव्हल्स उलटली; ३४ प्रवासी किरकाेळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 18:17 IST

राष्ट्रीय महामार्गावरील १४ मैल परिसरातील घटना

धामणा (नागपूर) : चालकाला वाहन चालवताना डुलकी लागली आणि वेगात असलेली ट्रॅव्हल्स अनियंत्रित हाेऊन राेडलगत उलटली. यात ट्रॅव्हल्समधील ३४ प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) लगतच्या १४ मैल परिसरात आज (दि. २४) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.

जखमींमध्ये ट्रॅव्हल्स चालक मोनू राव (३६) व इम्रान खान (४०) दाेघेही रा. इंदाेर, मध्य प्रदेश, उर्वशी रजत (३०, रा. छतीसगड), चित्रलेखा शाहू (३०) व अजित सिंग (३३) दाेघेही रा. पुणे, श्रेयस जाधव (२५) व स्नेहल पवार (२१) दाेघेही रा. सातारा, शंकर घुगे (२२, रा. मालेगाव, जिल्हा वाशिम) यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सर्व प्रवासी एनएल-०७/बी-०६०६ क्रमांकाच्या हंस कंपनीच्या ट्रॅव्हल्सने पुण्याहून नागपूर मार्गे रायपूर (छत्तीसगड)ला जात हाेते.दरम्यान, १४ मैल परिसरात चालकाचा वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सवरील ताबा सुटला आणि ती ट्रॅव्हल्स राेडलगत नालीत शिरून उलटली. यात ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी किरकाेळ जखमी झाले. अपघात हाेताच खुर्सापार वाहतूक पाेलीस चाैकीतील पाेलीस कर्मचाऱ्यांसह कळमेश्वर पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना ट्रॅव्हल्समधून काढले. प्रवाशांनी उपचार केल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

प्रवाशांच्या सूचनेकडे चालकाचे दुर्लक्ष

या ट्रॅव्हल्समध्ये मोनू राव व इम्रान खान हे दाेन चालक हाेते. इम्रानने पहाटे स्टेअरिंग हाती घेतले. ताे ट्रॅव्हल्स व्यवस्थित चालवित नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी माेनूला ट्रॅव्हल्स चालविण्याची सूचना केली. मात्र, दाेन्ही चालकांनी प्रवाशांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. इम्रानने मध्येच एका हाॅटेलजवळ ट्रॅव्हल्स थांबविली हाेती. त्याला चक्कर येत असल्याने प्रवाशांनी त्याला औषध घेऊन आराम करण्याची सूचना केली हाेती. अशा स्थितीत त्याने गुटका खाऊन पुन्हा ट्रॅव्हल्स चालवायला सुरुवात केली आणि हा अपघात झाला.

पर्यायी ट्रॅव्हल्सची व्यवस्था

ही ट्रॅव्हल्स २०० फूट फरफटत जावून राेडलगतच्या नालीत उलटली. सर्व प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढण्यात आल्यानंतर दाेन क्रेनच्या मदतीने ती ट्रॅव्हल्स बाहेर काढण्यात आली. सर्व जखमी प्रवाशांवर उपचार केल्यानंतर त्यांना पर्यायी ट्रॅव्हल्सची व्यवस्था करून रायपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर