अनियंत्रित ट्रॅक्टर दुभाजकावर आदळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST2021-02-05T04:40:35+5:302021-02-05T04:40:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर रस्ता दुभाजकावर आदळला. त्यात गंभीर जखमी झालेल्या ट्राॅलीमधील ...

An uncontrolled tractor collided with a divider | अनियंत्रित ट्रॅक्टर दुभाजकावर आदळला

अनियंत्रित ट्रॅक्टर दुभाजकावर आदळला

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर रस्ता दुभाजकावर आदळला. त्यात गंभीर जखमी झालेल्या ट्राॅलीमधील तरुण मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापा शहरातील पतिराम वाडी येथे रविवारी (दि.२४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

संजय अमरलाल सेलू (२७, रा. जुनी वस्ती, खापा, ता. सावनेर) असे मृत मजुराचे नाव आहे. सावनेर येथून खापा येथे येत असलेल्या एमएच-४०/एल-९४६१ क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर रस्ता दुभाजकावर आदळला. त्यात ट्राॅलीमध्ये बसलेला संजय हा उसळून खाली पडला व त्याच्या डाेक्याला गंभीररीत्या दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळाहून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. सदर ट्रॅक्टर पाेलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी फिर्यादी ईश्वर सेवकराम धुर्वे (२५, रा. खापा) यांच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी आराेपी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, त्याचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजय मानकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

Web Title: An uncontrolled tractor collided with a divider