शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित बोलेरोचा नागपुरातील जरीपटक्यात हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:58 IST

बोलेरोच्या चालकाने गुरुवारी रात्री जरीपटक्यात हैदोस घातला. अनेक वाहनांना धडक देत एका नगरसेवकाचा बळी घेतला तर काहींना जखमी केले. गुरुवारी रात्री ७.४५ वाजता घडलेल्या या थरारामुळे कामगारनगर, जरीपटक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

ठळक मुद्देअनेक वाहनांना धडक : नगरसेवकाचा मृत्यू : एक गंभीर जखमी

आॅनलाईन लोकमतनागपूर : बोलेरोच्या चालकाने गुरुवारी रात्री जरीपटक्यात हैदोस घातला. अनेक वाहनांना धडक देत एका नगरसेवकाचा बळी घेतला तर काहींना जखमी केले. गुरुवारी रात्री ७.४५ वाजता घडलेल्या या थरारामुळे कामगारनगर, जरीपटक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.कस्तुरबा गांधी वॉर्ड भंडारा येथील रहिवासी गजानन रामाजी शेंडे (वय ३९) यांच्या तक्रारीनुसार, एमएच ४०/ एएफ ९६०२ क्रमांकाच्या भरधाव बोलेरो चालकाने कामठीतील नगरसेवक नरेंद्र भुटानी (वय ६५) यांच्या अ‍ॅक्टीव्हाला जोरदार धडक मारली. ते खाली पडले असतानाच आरोपी चालकाने शेंडे यांच्या अ‍ॅक्टीव्हाला धडक मारली. त्यानंतरही वाहनाचा वेग कमी न करता आरोपी बोलेरो चालकाने पुन्हा एका वाहनाला धडक मारली. यानंतर आरोपीचे वाहन अडकले. त्यामुळे आरोपी बोलेरोचालक पळून गेला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी आणि तणाव निर्माण झाला. जमावाने जखमी भुटानी आणि इतरांना इस्पितळात नेले असता भुटानींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. भुटानी हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी असून, कामठीचे नगरसेवक आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कामठीतील अनेक समर्थक गुरुवारी रात्री मेयोत पोहचले. दरम्यान, शेंडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.जखमी व्यक्तीचे निधन२० नोव्हेंबरला दुपारी १२ च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सलिम खान रशम खान पठाण (वय ४०, रा. जुना दिघोरी) यांचा करुण अंत झाला. अपघातानंतर त्यांनाउपचाराकरिता मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर