काकाचा पुतण्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:11+5:302021-07-11T04:07:11+5:30

नागपूर - कळमन्यातील एक १३ वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाली. रात्र झाली तरी परतली नाही त्यामुळे पालकांनी पोलिसांकडे ...

Uncle attacks nephew | काकाचा पुतण्यावर हल्ला

काकाचा पुतण्यावर हल्ला

नागपूर - कळमन्यातील एक १३ वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाली. रात्र झाली तरी परतली नाही त्यामुळे पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.

----

जरीपटक्यात एकाचा अकस्मात मृत्यू

नागपूर - जरीपटक्यातील विश्वासनगरात राहणारे कृष्णकुमार नंदलाल शर्मा (वय ५४) यांच्या घरी मंदिराची साफसफाई करणारे बिहारी बाबू (वय ५०) यांचा शुक्रवारी आकस्मिक मृत्यू झाला. रात्री ८ वाजता हा प्रकार उघडकीस आला. शर्मा यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

विहिरीत मृतदेह आढळला

नागपूर - मानकापुरातील कोहळे ले-आऊटमध्ये राहणारे मनोज मधुकरराव पुनावार (वय ५२) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या आवारात असलेल्या विहिरीत आढळला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Uncle attacks nephew