शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 22:08 IST

महामेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर एक टिफिनबॉक्स बेवारस अवस्थेत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला आढळून आल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देप्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ : महामेट्रोतर्फे मॉक ड्रील

लोकमत  न्यूज  नेटवर्क        नागपूर : महामेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर एक टिफिनबॉक्स बेवारस अवस्थेत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला आढळून आल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती स्टेशन नियंत्रकांनी बॉम्बशोधक नाशक पथकाला दिली. सूचना मिळताच अ‍ॅम्ब्युलन्स आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाहणी व पडताळणी केल्यानंतर डब्यात कुठलेही ज्वलनशील पदार्थ नसल्याचे घोषित केले. महामेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रीलचे आयोजन केल्याची माहिती प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास स्टेशनवर साफसफाई करणाऱ्या पंकज नामक कर्मचाऱ्याचे लक्ष एस्केलेटरजवळ असलेल्या टिफिन बॉक्सवर गेले. त्याला हे प्रकरण संशयास्पद वाटले. कुणीतरी टिफिन बॉक्स विसरलेला नसून जाणीवपूर्वक ठेवल्याचा त्याने अंदाज लावला. रिच-१ ची मेट्रो वाहतूक प्रवाशांसाठी खुली झाली असल्याने एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. दर तासाने मेट्रोची ये-जा असल्याने कुठल्याहीवेळी मेट्रोचे आगमन होऊन प्रवासी स्टेशनवर उतरतील व गर्दी वाढेल, असा अंदाज पंकजने लावला. आपत्कालीन स्थितीचा अंदाजा घेत वेळ वाया न घालवता त्याने याची माहिती स्टेशन कंट्रोलर शशांक पाटीलला दिली. पाटील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जागेवर पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी त्वरित बॉम्बशोधक नाशक पथकाला (बीबीडीएस) सूचना दिली. अंदाजे ३० मिनिटात पथक स्थानकावर दाखल झाले. या पथकाने लगेचच सावधगिरी बाळगत हालचाली सुरू केल्या. याआधी स्टेशन परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला होता. सूचना मिळताच पोलीस पथक आणि अ‍ॅम्ब्युलन्सदेखील घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाहणी व पडताळणी केल्यानंतर डब्यात कुठलेही ज्वलनशील पदार्थ नसल्याचे घोषित केले. पथकाने सामग्री तपासणीसाठी ताब्यात घेतली.स्थानकावरील कर्मचाऱ्यांना नियमितपणे सुरक्षेसंदर्भात नियमित प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय आपत्कालीन स्थितीत इतरांच्या बचावासाठी करायच्या हालचाली आणि स्वयंसुरक्षेचे प्रशिक्षण तसेच सुरक्षा नियम, सावधगिरीसाठी मूलभूत माहितीही देण्यात येते. अशा पद्धतीने मेट्रो स्थानकांची सुरक्षा आणि दक्षतेचे परीक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. महामेट्रोने आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त मॉक ड्रीलचे आयोजन केले आहे, हे विशेष.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर