शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर मिळेना, हॉटेलमध्ये पेटल्या चुली ! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाच ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:30 IST

Nagpur : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांचा मोठा फटका आता नागपूरच्या खाद्य जगताला बसू लागला आहे. शहरात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल उद्योगाचा श्वास कोंडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांचा मोठा फटका आता नागपूरच्या खाद्य जगताला बसू लागला आहे. शहरात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल उद्योगाचा श्वास कोंडला आहे. गेल्या चार दिवसांपासून सिलिंडरचा 'दुष्काळ' पडल्याने गॅसच्या निळ्या ज्योतीवर शिजणारी नागपूरची चव आता चक्क लाकडाच्या धुरावर तग धरून आहे. ही परिस्थिती केवळ गॅसच्या टंचाईची नसून, हजारो हातांच्या रोजगारावर आलेली संक्रांत आहे.

कामगारांचे आरोग्य धोक्यात

नागपूरच्या गजबजलेल्या सीए रोड, बर्डी आणि आयटी पार्क परिसरातील हॉटेलमध्ये आता विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलिंडर नसल्याने अनेक हॉटेलमालकांनी नाईलाजास्तव जुन्या काळातील चुली' पेटवल्या आहेत. हॉटेलच्या मागच्या बाजूला किंवा छतावर लाकडं आणि कोळसा जाळून अन्न शिजवले जात आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत नाही, तर धुरामुळे कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नागपूरच्या हवेत आता मसाल्यांच्या वासाऐवजी लाकडाच्या धुराचा दर्प अधिक जाणवू लागला आहे.

लाकडे जळली तर वाढेल वायुप्रदूषण

शहरातील लहानमोठ्या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ शिजविण्यास सिलिंडरऐवजी लाकडे जाळण्यात आल्यास प्रदूषणाचेही मोठे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. कार्बन मोनोऑक्साइड श्वसनास हानिकारक आहे. कार्बन डायऑक्साइड हरितगृह वायू असून, हवामान बदलाला कारणीभूत ठरतो. सूक्ष्म धूरकण हवेत पसरतात. हे फुप्फुसात जाऊन दमा, श्वसनाचे आजार वाढवतात. नायट्रोजन ऑक्साइड वायू स्मॉग तयार होण्यास आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करण्यास कारणीभूत ठरतो.

प्रशासकीय यंत्रणा आणि 'एसेन्शियल कमोडिटी अॅक्ट'

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्र सरकारने 'अत्यावश्यक वस्तू कायदा' लागू केला आहे. तेल शुद्धीकरण कारखान्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नागपूरच्या स्थानिक बाजारपेठेत हा पुरवठा कधी पूर्ववत होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत साठेबाजी रोखण्याचे मोठे आव्हान अन्न पुरवठा विभागासमोर आहे.

"सरकारच्या आदेशानुसार गॅस एजन्सीने रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला आहे. ज्यांच्याकडे सिलिंडर आहेत, ते तग धरून आहेत. नंतर त्यांनाही रेस्टॉरंट बंद करावे लागेल. अशा कठीण परिस्थितीत आम्ही सरकारसोबत आहोत."- तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशन.

"नागपुरात २ ते ३ दिवसांचा गॅस सिलिंडरचा साठा असतो. दरदिवशी सिलिंडर रिफिलिंग करावे लागतात. घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत आहे, तर व्यावसायिक सिलिंडर विकण्यावर बंधने आहेत. हॉस्पिटल आणि गरजूंना सिलिंडर देण्यात येत आहेत. गॅस सिलिंडरचा कुणीही साठा करू नये."- विनोद काळे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी.

"रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सिलिंडरचा पुरवठा करावा, या मागणीसाठी असोसिएशनचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत."- भवानीशंकर दवे, अध्यक्ष, नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन. 

English
हिंदी सारांश
Web Title : No Cylinders, Stoves Lit in Hotels! Commercial Supply Disrupted.

Web Summary : Nagpur's hotels face crisis as commercial cylinder supply halts due to Middle East tensions. Restaurants resort to wood-burning stoves, raising pollution concerns. Authorities are urged to restore supply to prevent business closures and health hazards.
टॅग्स :nagpurनागपूरCylinderगॅस सिलेंडर