शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

उमरेड डीव्हीआर चोरी प्रकरण : पीएसआय, नायब तहसीलदारवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:53 PM

लोकसभा निवडणूक दरम्यान उमरेड येथील आयटीआयमधील तात्पुरत्या स्ट्राँग रुम परिसरातून डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी झाली होती. या प्रकरणात एक पीएसआय आणि नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्चित करण्यात आला असून दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक दरम्यान उमरेड येथील आयटीआयमधील तात्पुरत्या स्ट्राँग रुम परिसरातून डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी झाली होती. या प्रकरणात एक पीएसआय आणि नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्चित करण्यात आला असून दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक लोकसभा मतदार संघात निवडणुकीदरम्यान उमरेड विधानसभा क्षेत्राकरिता येथील आयटीआय परिसरात तात्पुरती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती. मतदानानंतर विधानसभा क्षेत्रातील सर्व ईव्हीएम येथे गोळा करण्यात आल्या. त्यानंतर सर्व ईव्हीएम कळमना एपीएमसी परिसरातील मुख्य स्ट्राँग रूम येथे हलविण्यात आल्या. ईव्हीएम हलविण्याच्या दोन-तीन दिवस आधी स्ट्राँग रूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दोन डीव्हीआर आणि एक दोन एलसीडी स्क्रीन चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी चोरीची तक्रार करण्यात आली. रामटेक येथील काँँग्रेसचे उमेवादर किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे याची तक्रार केली. त्यानंतर दोनसदस्यीय चौकशी पथकाने परिसराची पाहणी करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मागविला. यात संपूर्ण प्रकरणासाठी पोलीस निरीक्षक आणि स्ट्राँग रुमची जबाबदारी असलेल्या नायब तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात आले. या दोघांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Electionनिवडणूकtheftचोरी