उमेश यादव नागपूर मनपाचा "स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर"

By Admin | Updated: January 15, 2017 20:48 IST2017-01-15T20:48:59+5:302017-01-15T20:48:59+5:30

विदर्भाचा वेगवान गोलंदाज व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड

Umesh Yadav Nagpur Municipal Corporation's "cleanliness brand ambassador" | उमेश यादव नागपूर मनपाचा "स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर"

उमेश यादव नागपूर मनपाचा "स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर"

>
ऑनलाइन लोकमत
नागपूर, ता. 15. - विदर्भाचा वेगवान गोलंदाज  व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर राहणार असून यासाठी नुकतीच त्यांनी औपचारीक संमती दिली आहेत. यापूर्वी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी त्वरित होकार दिला होता, हे विशेष. नागपूर शहरासाठी स्वच्छत भारत या महत्वाच्या अभियानाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी मनपाचे आभार मानले. तसेच आपल्या व्यस्त दैनंदिनीमधून नागपूरकांसाठी आपण नक्कीच वेळ काढणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानासाठी नागपूरचे स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागाबद्दल महापौर प्रविण दटके व मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उमेश यादव यांचे आभार मानले. वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव यांनी विदर्भाची छाप भारतीय संघात उमटविली आहे. भारतीय संघातील ऑरेंजसिटीची शान असलेल्या उमेश यादव यांच्या सहभागामुळे अभियानाला मोलाची मदत होईल असा विश्वास मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
 
 

Web Title: Umesh Yadav Nagpur Municipal Corporation's "cleanliness brand ambassador"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.