शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उमा भारतींनी केले बुक स्टॉलवाल्या तरुणास माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:05 IST

मंगळवारी बुक स्टॉलवाल्या तरुणाने बंद असलेले एस्केलेटर सुरू केल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती घाबरल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बुधवारी जीटी एक्स्प्रेसने उमा भारती जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. यावेळी बुक स्टॉलवाल्या तरुणाने रडत रडत उमा भारतींची माफी मागितली. त्यावर मोठ्या मनाने उमा भारतींनीदेखील या तरुणाला माफ केले. परंतु आरपीएफने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे आता न्यायालयातच याबाबत निर्णय होणार आहे.

ठळक मुद्देएस्केलेटर सुरू केल्यामुळे झाला होता गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी बुक स्टॉलवाल्या तरुणाने बंद असलेले एस्केलेटर सुरू केल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती घाबरल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बुधवारी जीटी एक्स्प्रेसने उमा भारती जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. यावेळी बुक स्टॉलवाल्या तरुणाने रडत रडत उमा भारतींची माफी मागितली. त्यावर मोठ्या मनाने उमा भारतींनीदेखील या तरुणाला माफ केले. परंतु आरपीएफने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे आता न्यायालयातच याबाबत निर्णय होणार आहे.केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती नागपूर रेल्वेस्थानकावरील एस्केलेटरवरून जात असताना ते अचानक सुरू झाल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. बंद एस्केलेटरवरून जात असताना ते अचानक सुरू झाल्यामुळे उमा भारती घाबरल्या होत्या. त्यांनी स्व:तला सावरले. रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून याबाबत लेखी तक्रार नोंदविली होती. उमा भारती एस्केलेटरवर चढल्या त्या वेळी एका बुक स्टॉलवाल्या तरुणाला एस्केलेटर बंद असल्याचे लक्षात आले. त्याने त्याच्या जवळील चावीने ते सुरू केले. परंतु तो रेल्वेचा अधिकृत कर्मचारी नसून त्याने एस्केलेटर का सुरू केले, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. रेल्वे सुरक्षा दलाने या बुक स्टॉलवाल्या तरुणाविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १५५ नुसार गुन्हा दाखल केला होता. याबाबत आता रेल्वे न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, बुधवारी उमा भारती जीटी एक्स्प्रेसने परत जाण्यासाठी आल्या असताना बुक स्टॉलवाला तरुण राजा श्रीवास याने त्यांची भेट घेतली. काल एस्केलेटर आपणच सुरू केल्याचे त्याने सांगितले. एस्केलेटर बंद होते. परंतु आपण जात असल्यामुळे आपणास त्रास होऊ नये म्हणून मी ते सुरू केले, अशी माहिती या तरुणाने उमा भारतींना देऊन माफी मागितली. त्यावर उमा भारतींनीही त्याला माफ केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीrailwayरेल्वे