अखेर वादग्रस्त शेलोटची बदली

By Admin | Updated: October 18, 2015 03:15 IST2015-10-18T03:15:28+5:302015-10-18T03:15:28+5:30

अनेक प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या जयंता शेलोट या पोलीस शिपायाची अखेर कोतवाली ठाण्यात...

Ultimately switched to controversial shellottees | अखेर वादग्रस्त शेलोटची बदली

अखेर वादग्रस्त शेलोटची बदली

नागपूर : अनेक प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या जयंता शेलोट या पोलीस शिपायाची अखेर कोतवाली ठाण्यात बदली करून त्याला परिमंडळ तीनच्या उपायुक्त कार्यालयात संलग्नित करण्यात आले.
आधी खंडणीचा गुन्हा, नंतर अटक, पीसीआर, निलंबन आणि पुन्हा सेवेत रुजू झालेल्या जयंताची सहा महिन्यांपूर्वी अचानक गुन्हेशाखेत वर्णी लागल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्याच्या नियुक्तीपासूनच आरोपाच्या फैरी झडल्या. या पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणी गुन्हेशाखेने कारवाया केल्या आणि त्यातील अनेक कारवायात जयंता शेलोट वादग्रस्त झाला. हॉटेल मालकावर कारवाई करून त्याला देशी कट्टा प्रकरणात आरोपी बनविण्यासोबतच त्याच्याकडून दोन लाखांची मागणी केल्याचे प्रकरण सर्वत्र गाजले. चौकशी सुरू असतानाच एका बुकीच्या अड्ड्यावर धाड घालण्यासाठी एका गुन्हेगाराचे वाहन वापरल्याचे वृत्त पुढे आल्याने गुन्हेशाखेचीच मान शरमेने खाली गेली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रारी झाल्या. स्थानिक अधिकारी जयंताची पाठराखण करीत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जयंताची गुन्हेशाखेतून उचलबांगडी करून त्याला कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Ultimately switched to controversial shellottees