उल्हासनगरच्या प्रभारी सहायक आयुक्तांचा कार्यभार काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:34 IST2017-12-15T19:30:56+5:302017-12-15T19:34:25+5:30
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.

उल्हासनगरच्या प्रभारी सहायक आयुक्तांचा कार्यभार काढणार
आॅनलाईन लोकमत
नागपूर : उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले. प्रवीण दरेकर यांनी उल्हासनगर पालिकेतील मागासवर्गीय भरतीतील घोटाळ््यासंदर्भातील मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
अलका पवार यांची २००३ साली महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेंतर्गत वरिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती झाली. त्यांना उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावरून थेट सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आलेली नसून सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. हा पदभार काढून घेण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी सभागृहाला दिले.