शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:16 IST

Winter Session Maharashtra 2022 : आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त पेटवायचा अवकाश - उद्धव ठाकरे

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्व मानणारे आहेत. ते नेहमी देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं यासाठी दिल्लीला जावं लागतं. आजचा दिवस गेलाय म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस निट जावा यासाठी नवस करतोय.., मात्र यात महाराष्ट्राचं भलं कुठे आलं? सीमावादाच्या मुद्द्यावर ते नवस केव्हा करणार असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

कानडी लोकांकडून मराठी भाषिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सरकार बोलायला तयार नाहीत. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. जोपर्यंत सीमावादाचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. 

हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे तीन दिवस वाया गेले. याचा जाब सत्ताधाऱ्यांनाच विचारावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी राज्यातील सरकार असंवैधानिक आहे, असे म्हटले आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले स्वामींनी त्यांना घरचा अहेर दिला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली. 

शेतकरी हैराण सत्तार खातो गायराण; गायराण जमिन प्रकरणात विरोधक आक्रमक 

नागपूर मौजे घोडबाभूल जिल्हा वाशिम येथील सरकारी गायराण जमिन १५० कोटीची आहे. गायराण जमिनी कुणाला देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निणर्य आहे. ही माहिती सरकारला असतानाही ३७ एकर गायराण जमिन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निणर्य घेतला आहे. या प्रकरणात नागपूर खंडपीठाने आपले गंभीर निरिक्षण नोंदिले आहे. तत्कालीन अब्दूल सत्तार यांच्या प्रकरणी पुरावे आहे. यासंदभर्ात अजित पवार यांनी विधानसभेत आरोप केला. यावेली तत्काळ मंत्रिमंडळातून सत्तार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. या मुद्यावर गोंधळ घालत, विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायर्यावर सत्तार आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस