शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

जगात वाढत आहे टाईप-१ मधुमेह

By admin | Updated: July 27, 2015 04:14 IST

जगात टाईप-१ वर्गातील मधुमेह वाढत आहे. पूर्वी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे साधारण तीन वर्षांत या आजाराचे

वामन खाडिलकर : इंडियन अकॅडमी आॅफ पीडियाट्रिक्सची कार्यशाळानागपूर : जगात टाईप-१ वर्गातील मधुमेह वाढत आहे. पूर्वी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे साधारण तीन वर्षांत या आजाराचे दोन-तीन रुग्ण दिसायचे, आता दोन महिन्यात एक-दोन मुले आढळून येत आहेत. या आजारातील रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन निर्मिती होत नसल्याने इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे हाच उपचार आहे. अशा रुग्णांना दिवसातून तीन आणि जास्तीतजास्त पाचवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. हा आजार अनुवांशिक नाही. इन्सुलिन घेणाऱ्या भावंडातही हा आजार दिसून येण्याची शक्यता असते, अशी माहिती पुणे येथील केईएम हॉस्पिटलचे डॉ. वामन खाडिलकर यांनी दिली.इंडियन अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्स, नागपूर शाखेच्यावतीने ‘लहान मुलांमधील हार्मोन्स’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.- पालकांना माहीत असावीत याची लक्षणेडॉ. खाडिलकर म्हणाले, टाईप-१ वर्गातील मधुमेह हा व्हायरसमुळे होणाऱ्या आजारातून, आहारातील प्रदूषणामुळे किंवा हार्मोन्समध्ये ढवळाढवळ करणाऱ्या एखाद्या घटकामुळे होऊ शकतो. न्यूझिलॅन्डमध्ये एका मुलाला गाईच्या दुधातून हा आजार झाल्याचे समोर आले आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे पाणी जास्त पिणे, वारंवार लघवी होणे, पूर्वी जे गादीवर लघवी करीत नव्हते ते करायला लागणे. धक्कादायक म्हणजे, या आजाराच्या लक्षणाची माहिती अनेकांना राहत नसल्याने निम्मे रुग्ण बेशुद्ध व गंभीर अवस्थेतच डॉक्टरांकडे येतात. (प्रतिनिधी)समाजात जनजागृती आवश्यकया आजाराला घेऊन समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. विशेषत: शाळेतील शिक्षकांना या आजाराची माहिती असणे व अशा रुग्णांना शाळेत इन्सुलिन्स घेण्यासाठी वेगळा कक्ष असणे आवश्यक आहे. मात्र अनेक पालक आपल्या मुलाला हा आजार असल्याचे लपवून ठेवतात आणि येथूनच मोठ्या समस्या निर्माण होतात. सरकारने नि:शुल्क इन्सुलिन्स उपलब्ध करावेभारतात दिवसेंदिवस हा आजार वाढत आहे. सर्वच स्तरावरील कुटुंबांमध्ये हा आजार होऊ शकतो. या आजारावरील उपचाराचा खर्च मोठा आहे. यामुळे गरीब रुग्ण उपचाराविना राहतात. त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. देशात केवळ कर्नाटक आणि केरळमध्ये इन्सुलिन्स मोफत मिळते. महाराष्ट्रातही ही सोय किमान शासकीय रुग्णालयांमध्ये तरी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रोथ चार्टचे पालन करणे महत्त्वाचेवयाच्या प्रमाणात लहान मुलांचे वजन, उंची किती असावी, यावर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) ‘ग्रोथ चार्ट’आहे. डब्ल्यूएचओचा हा चार्ट शून्य ते पाच वर्षांपर्यंत मुलांसाठी ‘स्टॅण्डर्ड’ आहेत. मात्र भारतीय मुलांचे आरोग्य संस्थेने सर्वेक्षण करून पाच ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी नव्याने ग्रोथ चार्ट तयार केला आहे. मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी प्रत्येक बालरोग तज्ज्ञांनी या चार्टचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यशाळेत डॉ. सुधा राव यांनी ‘हायपोथॉयरॉयडिझम’ म्हणजे थायरॉईड ग्रंथीतील स्राव कमी होणे यावर, तर डॉ. हरी मंगतानी यांनी कमी वयात येणारी पौगंडावस्था यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इंडियन अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. आर.जी. पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.