शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दाेन वर्षाची ट्रेनिंग, हवाई उड्डानाचे प्रशिक्षण शुन्य तास

By निशांत वानखेडे | Updated: October 3, 2024 18:08 IST

नागपूर फ्लाइंग क्लबचा भाेंगळ कारभार : विद्यार्थ्यांचे तीन दिवसांपासून उपाेषण

नागपूर : महाज्याेतीची परीक्षा उत्तीर्ण करून नागपूर फ्लाइंग क्लबमध्ये दाेन वर्षापासून प्रशिक्षण घेणारे १४ विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपाेषणाला बसले आहेत. कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) हा दीड वर्षाच्या काेर्ससाठी या विद्यार्थ्यांनी दाेन वर्षे घालवूनही हवाई उड्डानाचे शुन्य तास, एक तास, दाेन तास असे नगण्य प्रशिक्षण झाले. अशा नगण्य अनुभवाच्या विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून काेण नाेकरी देणार? या नैराश्याने विद्यार्थ्यांनी उपाेषण सुरू केले आहे.

संविधान चाैक येथे तीन दिवसापासून उपाेषणाला बसलेल्या १४ पैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती नाजुक झाली आहे. महाज्याेतीतर्फे सीपीएल या काेर्ससाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांचे १ नाेव्हेंबर २०२२ पासून नागपूर फ्लाइंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण १८ महिन्याचे असते. प्रशिक्षणात २०० तास हवाई उड्डाण होणे आवश्यक आहे. हवाई उड्डाणतास पूर्ण झाल्यानंतरच सी. पी. एल. अभ्यासक्रम पूर्ण होतो, यानंतरच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. परंतु मागील २३ महिन्यात विद्यार्थ्यांचे अतिशय नगण्य तास हवाई उड्डाण प्रशिक्षण झाले आहे. क्लबचे ट्रस्टी असलेले विभागीय आयुक्त, नागपूर फ्लाईंग क्लब, महाज्योती आणि विद्यार्थी व पालक यांच्या अनेकदा बैठका झाल्यात परंतु विद्यार्थ्यांचे हवाई उड्डाण तास अजूनही पूर्ण झाले नाहीत. नागपूर फ्लाईंग क्लब २३ महिन्यातही विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळे प्रशिक्षण केंद्र देण्यात यावे व तात्काळ हे प्रशिक्षण पूर्ण करावे, अशी मागणी उपाेषणकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचे किती प्रशिक्षणअविनाश येरणे, शुभम गोसावी व स्वप्नील चव्हाण शुन्य तास, रोहित बेडवाल एक तास, विनय भांडेकर ३ तास, सानिका निमजे ६ तास, भक्ती पाटील ११ तास, जयेश देशमुख व तेजस बडवार १५ तास, ऋतुंबरा देवकाते १६ तास, हार्दिका गोंधले २० तास, विश्वनाथ जाधव २५ तास, प्रणव सावरकर २८ तास, स्नेहल खैरनार ३५ तास.

२०० तास प्रशिक्षण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकत नाही. या विद्यार्थ्यांना काेण नाेकरी देणार? दाेन वर्षे वाया गेली, तरीही शासन दखल घेत नाही.उमेश कोर्राम, संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.

टॅग्स :nagpurनागपूरpilotवैमानिकEducationशिक्षण