दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले उपनगर, पंचवटी परिसरातील घटना : ८० हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: February 9, 2015 01:04 IST2015-02-09T01:04:44+5:302015-02-09T01:04:44+5:30

दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले उपनगर, पंचवटी परिसरातील घटना : ८० हजारांचा ऐवज लंपास

Two women's mangalasutra plots in suburb, Panchavati area: 80 thousand rupees lumpas | दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले उपनगर, पंचवटी परिसरातील घटना : ८० हजारांचा ऐवज लंपास

दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले उपनगर, पंचवटी परिसरातील घटना : ८० हजारांचा ऐवज लंपास

  नाशिक : शहरात चेन स्रॅचिंगच्या घटना सुरूच असून, शनिवारी उपनगर व पंचवटी पसिरातील दोन महिलांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेले़ पहिली घटना मेरी शाळेसमोर घडली़ तारवालानगर येथे राहणाऱ्या प्रतिभा रमाकांत शिरुडे या शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मेरी शाळेकडून हिरावाडीकडे पायी जात होत्या़ यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील पंधरा हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला़ या प्रकरणी शिरुडे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली़ मोटवानी रोडवरील श्रीप्रसाद सोसायटीत राहणाऱ्या प्रभा गणेश मुरलीधर(६३) या आपल्या भावासमवेत दत्तमंदिर सिग्नलवरील एका ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदीसाठी पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्यांनी मुरलीधर यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व पेंडल खेचून नेले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Two women's mangalasutra plots in suburb, Panchavati area: 80 thousand rupees lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.