दुचाकींची आपसात धडक, चाैघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:09+5:302021-07-26T04:08:09+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : वेगात असलेल्या दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरदार धडक झाली. त्यात दाेन्ही वाहनांवरील चाैघे जखमी झाले. ...

Two-wheelers collided, four injured | दुचाकींची आपसात धडक, चाैघे जखमी

दुचाकींची आपसात धडक, चाैघे जखमी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : वेगात असलेल्या दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरदार धडक झाली. त्यात दाेन्ही वाहनांवरील चाैघे जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधाळा येथील बिहालगाेंदी टी पाॅईटजवळ रविवारी (दि. २५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

जखमींमध्ये जीवनसिंग कल्याणसिंग टांक (५२, रा. हिंगणघाट, जिल्हा वर्धा), नानकसिंग रामसिंग करण (५०, रा. हिंगणा), हर्षल उत्तम नागपुरे (२२, रा. रिंगणाबोडी, ता. काटाेल) व सचिन शंकर उईके (२२, रा. सावंगा) या चाैघांचा समावेश आहे. जीवनसिंग व नानकसिंग एमएच-४०/बीआर-४०२० क्रमांकाच्या माेटरसायकलने हिंगण्याच्या दिशेने जात हाेते तर हर्षल व सचिन एमएच-४९/एजी-५१४५ क्रमांकाच्या माेटरसायकलने काेंढाळीकडे येत हाेते. दरम्यान, परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या या दाेन्ही माेटरसायकलींची दुधाळा येथील बिहालगाेंदी टी पाॅईंटजवळ जाेरदार धडक झाली.

यात चाैघांनाही गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि चारही जखमींना काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर चाैघांनाही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास हेडकाॅन्स्टेबल दारासिंग राठोड व पोलीस नायक उमेश पातुर्डे करीत आहेत.

Web Title: Two-wheelers collided, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.