दहेगाव येथील दुचाकी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:08 IST2021-05-01T04:08:23+5:302021-05-01T04:08:23+5:30

खापरखेडा : घरासमाेर उभी ठेवलेली दुचाकी चाेरट्याने चाेरून नेली. त्या दुचाकीची किंमत १५ हजार रुपये असून, ही घटना खापरखेडा ...

The two-wheeler was stolen from Dahegaon | दहेगाव येथील दुचाकी पळविली

दहेगाव येथील दुचाकी पळविली

खापरखेडा : घरासमाेर उभी ठेवलेली दुचाकी चाेरट्याने चाेरून नेली. त्या दुचाकीची किंमत १५ हजार रुपये असून, ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे नुकतीच घडली.

विनाेद चंद्रभान भाेयर (४३, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) याने त्याची एमएच-४०/एवाय-९०९१ क्रमांकाची माेटारसायकल गावातील एका घरासमाेर उभी ठेवली आणि दारू पिण्यास निघून गेला. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने ती चाेरून नेली. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. त्या दुचाकीची किंमत १५ हजार रुपये असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार उमेश ठाकरे करीत आहेत.

Web Title: The two-wheeler was stolen from Dahegaon