दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:55+5:302021-07-11T04:07:55+5:30
काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली. त्यात खाली काेसळल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू
काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली. त्यात खाली काेसळल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी गावाजवळ नुकतीच घडली.
नितेश ज्ञानेश्वर मरसकाेल्हे (२७, रा. काेंढासावळी, ता. काटाेल) असे मृताचे नाव आहे. ता. एमएच-४०/बीए-०२७८ क्रमांकाच्या माेटरसायकलने काेंढासावळीहून खडकीला जात हाेता. दरम्यान जुनेवाणी गावाजवळ त्याचा वेगात असलेल्या माेटरसायकलवरील ताबा सुटला आणि माेटरसायकल स्लीप झाल्याने गंभीर जखमी झाला. त्याला काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक लभाणे करीत आहेत.