दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST2021-05-12T04:09:31+5:302021-05-12T04:09:31+5:30

सावनेर : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि दुचाकीचालकास गंभीर दुखापत झाली. पुढे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू ...

Two-wheeler sleep, driver's death | दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू

दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू

सावनेर : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि दुचाकीचालकास गंभीर दुखापत झाली. पुढे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी- जांभळापाणी फाटा परिसरात नुकतीच घडली.

दिलीप बळीराम खांडेकर (५५, रा. काेच्छी, ता. सावनेर), असे मृताचे नाव आहे. ते माेटारसायकलने वेगात जात हाेते. दरम्यान, उमरी जांभळापाणी फाटा परिसरात त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती स्लीप झाल्याने ते खाली काेसळले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भा.दं.वि. २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार वरखडे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler sleep, driver's death