ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST2021-02-17T04:13:52+5:302021-02-17T04:13:52+5:30

कामठी : अनियंत्रित भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ड्रॅगन पॅलेस भुयारी ...

Two-wheeler seriously injured in truck collision | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

कामठी : अनियंत्रित भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ड्रॅगन पॅलेस भुयारी मार्ग ते नवीन कामठी मुख्य मार्गावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.

नेहाल राजू गेडाम (२७, रा. कुंभारे काॅलनी, नवीन कामठी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. नेहाल हा आपल्या एमएच-४०/सीई-३४६० क्रमांकाच्या दुचाकीने ड्रॅगन पॅलेस भुयारी मार्गाने नवीन कामठी येथील घराकडे जात हाेता. दरम्यान मागून येणाऱ्या एमएच-३१/एम-८५०१ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात नेहाल गंभीररीत्या जखमी झाला. नागरिकांनी त्यास कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालक माेहम्मद युनूस माे. युसूफ (४५, रा. वारेगाव बिना, ता. कामठी) यास अटक केली. याप्रकरणी नवीन कामठी पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३३८ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक व्ही. बी. कार्वेकर करीत आहेत.

Web Title: Two-wheeler seriously injured in truck collision