दुचाकीस्वार दाम्पत्यास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:26+5:302021-07-05T04:07:26+5:30

कन्हान : पत्नी व मुलीसाेबत माेटारसायकलने जात असलेल्या तरुणाच्या माेटारसायकलला मागून आलेल्या तरुणाने लाथ मारली आणि पत्नीकडील बॅग हिसकावून ...

The two-wheeler robbed the couple | दुचाकीस्वार दाम्पत्यास लुटले

दुचाकीस्वार दाम्पत्यास लुटले

कन्हान : पत्नी व मुलीसाेबत माेटारसायकलने जात असलेल्या तरुणाच्या माेटारसायकलला मागून आलेल्या तरुणाने लाथ मारली आणि पत्नीकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम, माेबाईल असा एकूण २८ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज हाेता. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा शिवारात शुक्रवारी (दि. २) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

बबलू तुलाराम साेनकुसरे (३२, रा. रामटेक) हा माेटारसायकलने पत्नी व मुलीला साेबत घेऊन नागपूर येथे सासऱ्याच्या घरी जात हाेता. दरम्यान, मागून ॲक्टिव्हाने आलेल्या तरुणाने त्याच्या माेटारसायकलला लाथ मारली. त्याने माेटारसायकलवर मागे बसलेल्या पत्नीच्या खांद्याला लटकवलेली लेडिज बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये आठ हजार रुपये राेख ९,७०० रुपयांचे साेन्याचे, तीन हजार रुपयांचे चांदीचे दागिने, आठ हजार रुपये किमतीचा माेबाईल हॅण्डसेट, कागदपत्र असा एकूण २८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच बबलू साेनकुसरे याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरूद्ध भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक जावेद शेख करीत आहेत.

Web Title: The two-wheeler robbed the couple