कंपनीसमाेरून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:16+5:302021-04-20T04:09:16+5:30
बुटीबाेरी : न्यू एमआयडीसी परिसरातील कंपनीसमाेर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात आराेपीने चाेरून नेली. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या ...

कंपनीसमाेरून दुचाकी लंपास
बुटीबाेरी : न्यू एमआयडीसी परिसरातील कंपनीसमाेर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात आराेपीने चाेरून नेली. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधा-मांगली मार्गावरील साेयाबीन कंपनी येथे नुकतीच घडली.
मनाेज वैजनाथ साह (४१, रा. प्लाॅट नं. ४१०, गल्ली नं. १० मिनीमातानगर ५ झाेपडा, वर्धमाननगर, नागपूर) हे २६ मार्चला आपल्या एमएच-४९/बीपी-९६०१ क्रमांकाच्या दुचाकीने न्यू एमआयडीसी बुटीबाेरी येथील साेयाबीन कंपनीत गेले हाेते. दरम्यान, कंपनीसमाेर दुचाकी उभी करून ते कंपनीतील त्यांच्या प्रमुखांकडे गेले. ते १० मिनिटात परत आले असता, त्यांची दुचाकी चाेरून नेल्याचे आढळून आले. दुचाकी किंमत ६० हजार रुपये आहे. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार असलम नाैरंगाबादे करीत आहेत.