काेविड सेंटरसमाेरून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:54+5:302021-04-18T04:07:54+5:30
काटाेल : काेविड केअर सेंटरसमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत १५ हजार रुपये आहे. ही ...

काेविड सेंटरसमाेरून दुचाकी लंपास
काटाेल : काेविड केअर सेंटरसमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत १५ हजार रुपये आहे. ही घटना काटाेल शहरात नुकतीच घडली.
प्रवीण विनायकराव भाेसे (३६, रा. पंचवटी, काटाेल) यांनी त्यांच्या मालकीची एमएच ४०/यू ०९२६ क्रमांकाची माेटरसायकल काटाेल शहरातील महेश भवन येथील काेविड केअर सेंटरसमाेर उभी ठेवली हाेती. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना अज्ञात चाेरट्याने ती चाेरून नेली. सर्वत्र शाेध घेऊन ती माेटरसायकल कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. त्या माेटरसायकलची किंमत १५ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार भेंडे करीत आहेत.