वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:55+5:302021-01-17T04:08:55+5:30
काेराडी/खापरखेडा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार
काेराडी/खापरखेडा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील काेराडी तलाव परिसरात शुक्रवारी (दि. १५) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली.
नागाे मेघरासे (वय ३५, रा. नांदा-काेराडी, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. ते दुचाकीने नागपूरहून नांदा (काेराडी) येथे ते जात हाेते. काेराडी तलाव परिसरातील उड्डाण पुलाजवळ मागून वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली आणि वाहनचालक वाहनासह सावनेरच्या दिशेने पळून गेला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने नागाे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जाेरात आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच पाेलिसांनीही घटनास्थळ गाठले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. नागाे विवाहित असून, त्यांना दाेन मुले आहेत. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.