अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यूू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:06 IST2021-06-11T04:06:59+5:302021-06-11T04:06:59+5:30

उमरेड : अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ...

Two-wheeler killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यूू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यूू

उमरेड : अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव (गाेटाळी) परिसरात मंगळवारी (दि.८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

दिनेश अंबादास डडमल (३०, रा. खेक, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे. मृत दिनेश हा एमएच-३२/एजी-०९८६ क्रमांकाच्या दुचाकीने उमरेड-बेसूर मार्गाने जात हाेता. दरम्यान, चारगाव (गाेटाळी) परिसरात अज्ञात चारचाकी वाहनचालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दिनेशला गंभीररीत्या दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक राजीव लाेले करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in unidentified vehicle collision