ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST2021-07-21T04:08:07+5:302021-07-21T04:08:07+5:30

माैदा : जड वाहतुकीच्या भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ...

Two-wheeler killed in truck crash | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

माैदा : जड वाहतुकीच्या भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदी पुलावर शनिवारी (दि.१७) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

धम्मशील प्यारेलाल सहारे (३६, रा. आंबेडकर वाॅर्ड, पेट्राेलपंप ठाणा, जवाहरनगर, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे. धम्मशील हा आपल्या एमएच-३६/एडी-३४९३ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने नागपूरहून माैदा मार्गे भंडाराकडे जात हाेता. दरम्यान, मागून भरधाव येणाऱ्या जड वाहतुकीच्या अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या दुचाकीला जाेरात धडक देत पसार झाला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने धम्मशीलचा मृत्यू झाला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी आराेपी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in truck crash