ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST2020-12-13T04:25:52+5:302020-12-13T04:25:52+5:30

माैदा : भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची ही ...

Two-wheeler killed in truck crash | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

माैदा : भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-नागपूर महामार्गावर शुक्रवारी (दि.११) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

नेकराम परसराम भाेयर (५८, रा. लाखनी, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे. नेकराम भाेयर हे आपल्या दुचाकीने भंडारा येथून नागपूरला जात हाेते. दरम्यान महामार्गावरील मधुबन हाॅटेलजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी माेरेश्वर रूपचंद कुतीरकर (४१, रा. लाखनी, जि. भंडारा) यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक माेहाेड करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in truck crash