ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:40+5:302021-03-17T04:08:40+5:30
भिवापूर : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जाेरात धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एक ...

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भिवापूर : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जाेरात धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एक किरकाेळ जखमी झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मेढा येथे साेमवारी (दि.१५) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
राेशन गणपतराव इंगळे (३२, रा. मेढा, ता. भिवापूर) असे मृताचे नाव असून, स्वप्निल भाऊराव कुमरे (२४, रा. पद्मा वाॅर्ड, पवनी) असे जखमीचे नाव आहे. मृत राेशन व स्वप्निल हे दाेघेही एमएच-४९/एव्ही-१४६७ क्रमांकाच्या दुचाकीने लग्नानिमित्त पांढरवाणी येथे गेले हाेते. दरम्यान, मेढा परिसरात भरधाव ट्रॅक्टरचालकाने निष्काळजीपणे वाहन पळवीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे स्टेअरिंग वळवून दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीचालक राेशनला गंभीररीत्या दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला तर, मागे बसलेल्या स्वप्निलला किरकाेळ दुखापत झाली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक भस्मे करीत आहेत.