कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST2021-04-28T04:08:50+5:302021-04-28T04:08:50+5:30

बुटीबाेरी : भरधाव कारचालकाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी ...

Two-wheeler killed in car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बुटीबाेरी : भरधाव कारचालकाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखैरी शिवारातील पाॅवर स्टेशनजवळ शनिवारी (दि.२४) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली.

कमलेश सदाशिव देशमुख (४५, रा. मानेवाडा, नागपूर) असे मृताचे नाव आहे. कमलेश देशमुख हे आपल्या एमएच-३१/सीवाय-९०३० क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या एमएच-४०/बीई-४३६४ क्रमांकाच्या अल्टाे कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात कमलेश हे खाली पडले व अंगावरून कार गेल्याने गंभीर जखमी हाेऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला. याप्रकरणी शिवकुमार हेमराज माेहाडे (३२, रा. बाेरखेडी) यांच्या तक्रारीवरून बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक चाैधरी करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in car crash