रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:56+5:302021-02-11T04:09:56+5:30

माैदा : रस्त्याने जाताना अचानक रानडुकराने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ...

Two-wheeler killed in bullfight | रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

माैदा : रस्त्याने जाताना अचानक रानडुकराने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील केसाेरी शिवारात साेमवारी (दि. ८) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

दादाराव लक्ष्मण आंबिलडुके (५०, रा. भूगाव, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. दादाराव आंबिलडुके हे आपल्या एमएच-४० / बीएच-०६३९ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने वडाेदा येथून भूगाव येथे जात हाेते. दरम्यान, केसाेरी शिवारात अचानक रानडुकराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजेंद्र रामराव बाळबुधे (४७, रा. भूगाव) यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Two-wheeler killed in bullfight