पुलावरून काेसळल्याने दुचाकीचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:09 IST2021-02-10T04:09:52+5:302021-02-10T04:09:52+5:30

काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने ताे दुचाकीसह पुलावरून खाली काेसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना ...

Two-wheeler killed after falling off bridge | पुलावरून काेसळल्याने दुचाकीचालक ठार

पुलावरून काेसळल्याने दुचाकीचालक ठार

काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने ताे दुचाकीसह पुलावरून खाली काेसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-नागपूर मार्गावरील सावळी फाटा परिसरात घडली.

सुरेश बाबूलाल बैस (५३, रा. सावळी, पर्बत, ता. काटाेल) असे मृताचे नाव आहे. ते एमएच-३१/एएक्स-२१५८ क्रमांकाच्या माेटरसायकलने शेतात गेले हाेते. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शाेध घेतला असता ते सावळी फाटा परिसरातील जाम नदीवरील पुलाखाली आढळून आले. जवळच त्यांची माेटरसायकलही पडली हाेती. ते काटाेलहून नागपूरच्या दिशेने जाताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि तुटलेल्या सुरक्षा कठड्यातून दुचाकीसह खाली काेसळले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार जवाहर चव्हाण करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed after falling off bridge