दुचाकीची कुत्र्याला धडक; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:29+5:302021-07-12T04:07:29+5:30

कळमेश्वर : भरधाव माेटारसायकलला कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात कळमेश्वर पाेलीस ...

Two-wheeler hits dog; Death of a young man | दुचाकीची कुत्र्याला धडक; तरुणाचा मृत्यू

दुचाकीची कुत्र्याला धडक; तरुणाचा मृत्यू

कळमेश्वर : भरधाव माेटारसायकलला कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलू शिवारात घडली.

चंदू गुणवंत डाखाेळे (३५, रा. हुडकाे काॅलनी, कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. ताे मोटारसायकलने (क्र. एमएच ४० एडी ९८४८) १४ मैलहून सेलूमार्गे कळमेश्वरला येत हाेता. दरम्यान, सेलू गावाजवळील सर्व्हिस राेडवर कुत्रा आडवा आल्याने माेटारसायकल कुत्र्यावर धडकली. यात चंदू हे खाली काेसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फाैजदार माेरेश्वर नागपुरे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler hits dog; Death of a young man