लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयशर ट्रकचालकाने धडक मारल्यामुळे दुचाकीवरील एका तरुणाचा करुण अंत झाला. योगेश रेवनाथ काळे (वय ३४) असे मृताचे नाव असून तो दिघोरी येथील शिवसुंदर नगरात राहत होता.योगेश सोमवारी पहाटे २.३५ च्या सुमारास उमरेड रोडवर दिघोरी चौक पुलाच्या खालून त्याच्या दुचाकीने येत असताना आरोपी आयशर ट्रकचालक अब्बास अली ( वय ३४, रा. भालदारपुरा) याने योगेशच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या योगेशचा मृत्यू झाला. मिळालेल्या सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक अब्बास अली याला अटक केली.
नागपुरात अपघातात दुचाकीचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:13 IST