शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

नागपूरच्या ग्रामीण भागात दारुड्या पोलिसाने दोघींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:28 IST

Accident Nagpur News धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले.

ठळक मुद्देधानकापणी करून घराकडे जाताना करुण अंतएक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले. यात दोन महिला ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रिया ढाब्याजवळ मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. रविता वासुदेव राऊत (१८) रा.पचखेडी तर सोनू गुलाब चांदेकर (३४) अशी मृत महिलांची नावे आहे. यात लक्ष्मी श्रीकृष्ण राऊत (३४) ही जखमी झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार वेलतूरवरून सुसाट वेगात दुचाकी क्रमांक एम.एच. ४ ९ / व्ही ४७८१ पचखेडीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी धानकापणीचे काम आटोपून महिला मजूर येत होत्या. दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीचालकाचे लक्ष न राहिल्याने व वेगावरून नियंत्रण सुटल्याने वाहन महिलांना चिरडत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. ही दुचाकी गोवर्धन वातूजी भोयर, रा.ब्राह्मणी चालवित होते. गोवर्धन हा लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो मूळचा ब्राह्मणी येथील राहणार आहे.

या अपघातात रविता व सोनू, लक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर काही वेळपर्यंत त्या जागीच पडून होत्या. एका स्थानिकाने याबाबत ठाणेदार किशोर वैरागडे यांना उपरोक्त अपघाताची माहिती दिली. यानंतर जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे हलविण्यात आले. त्यापैकी रविताचा मृत्यू झाला. तर सोनू हिला नागपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालावली. जखमी लक्ष्मी हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी भोयर याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३३७,३०४ सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भोयर यांच्यासोबत दुचाकीवर आणखी एक जण स्वार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर वैरागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .मदतीअभावी गेला रविताचा व सोनूचा जीवअपघातानंतर शेतमजूर महिला जखमी अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी महिला वेदनेने विव्हळत होत्या. मदतीची याचना करीत होत्या. मात्र काहीजण केवळ मोबाईलवर फोटो काढत राहीले. कुणीही खासगी वाहनाने किंवा रस्त्यावरील वाहन थांबवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले नाही. सोबतच्या महिला जखमींना धीर देत असल्याचे पहायला मिळाले. वेळेवर उपचार मिळाले असते तर रविताचा व सोनूचा जीव वाचला असता. बघ्यांच्या अशा संवेदनहीनतेमुळे रविता व सोनूचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे .

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू